राहुलजी, मोदींविरुद्धचे पुरावे दाखवाच- केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची माहिती व पुरावे असतील तर ते उघड करावेत, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. 

भाजप आणि काँग्रेस मैत्रीपूर्ण लढती करत आहेत असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 
केजरीवाल म्हणाले, "मोदी यांचा भ्रष्टाचारात वैयक्तिक सहभाग असल्याची कागदपत्रे राहुल गांधी यांच्याकडे खरोखरच असतील तर त्यांनी संसदेच्या बाहेर का उघड केले नाहीत?"

मैत्रीपूर्ण लढतींमध्ये भाजप म्हणत आहे की काँग्रेसच्या विरोधात त्यांच्याकडे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण आहे. तसेच, काँग्रेस म्हणत आहे की, भाजपविरोधात त्यांच्याकडे सहारा, बिर्ला प्रकरणे आहेत. पण दोघेही ते उघड करीत नाहीत, असे केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
 
Web Title: Kejriwal ‘dares’ Rahul to expose PM.