..उद्या तुमच्या मुलीसोबतही हे होऊ शकतं - केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनी गुरमेहर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून धमक्‍या येत असल्याने आंदोलन थांबविले आहे. तिला बलात्कार आणि हिंसेच्या धमक्‍या येत होत्या. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "तुम्हाला असा भारत हवा आहे का? जेथे भाजपवाले मुलींना उघडपणे बलात्काराच्या धमक्‍या देतात? उद्या तुमच्या मुलीसोबतही असा प्रकार होऊ शकतो?', असे म्हणत ट्विटरद्वारे टीका केली आहे.

दिल्लीतील रामजस महाविद्यालयात झालेल्या हिंसक संघर्षाचा निषेध करीत गुरमेहरने "अभाविप'च्या विरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडली होती. मात्र नंतर तिने ही मोहिम बंद केल्याची घोषणा केली. "मी ही मोहिम मागे घेत आहे. सर्वांचे अभिनंदन. मला एकटीला राहु द्या अशी विनंती. ही मोहिम माझ्यासाठी नव्हे, तर माझ्या सहकारी विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र मला खूप वाईट अनुभव आला. माझ्यासारखी 20 वर्षांची मुलगी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही', असे गुरमेहरने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर ट्विटरद्वारे टीका केली आहे.

Web Title: Kejriwal critics on BJP