गांधीजी होण्यासाठी पत्नीला सोबत ठेवावे लागते

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - गांधीजी होण्यासाठी पत्नीला सोबत ठेवावे लागते, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - गांधीजी होण्यासाठी पत्नीला सोबत ठेवावे लागते, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असतानाच, गेल्या महिन्या खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिकेवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र वापरल्यावरून केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. या दिनदर्शिकेवरून गांधीजींचे चित्र हटविण्यावर भाष्य करताना केजरीवाल यांनी पत्नीपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना लक्ष केले आहे. गेल्या महिन्यातही केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना भारतीय संस्कृतीची आठवण करून देत मन मोठे करण्याचा सल्ला दिला होता. "हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सांगते, की आपली वृद्ध आई आणि पत्नी यांना सोबत ठेवायला हवे. पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे. मनही थोडे मोठे करा', असे ट्‌विट करीत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगाविला होता.

पंतप्रधानांनी आपण आईची भेट घेतल्याची माहिती ट्विटरवर दिली होती. त्यानंतर केजरीवालांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली होती. "योग सोडून आईला भेटायला गेलो. तिच्यासोबत नाश्‍ता केला. आईसोबत वेळ घालवून छान वाटले,' असे ट्विट पंतप्रधानांनी केले होते. त्याला केजरीवाल यांनी ट्विट करीत आईसोबत वेळ घालवला, अशी दवंडी पिटू नका, असे प्रत्युत्तर दिले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मेहसाणा जिल्ह्यातील उंझामध्ये त्यांचा भाऊ अशोक मोदी यांच्याबरोबर राहतात. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर जशोदाबेन यांना मेहसाणा पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली. पंतप्रधान निवासात मोदी एकटेच राहतात. पंतप्रधान मोदींची आई, लहान भाऊ पंकज मोदी यांच्याबरोबर गांधीनगरमध्ये राहतात. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी आई हिराबा यांना आपल्या घरी बोलविले होते. तेव्हाचे छायाचित्रही त्यांनी शेअर केले होते.

Web Title: Kejriwal critique on modi