केजरीवालांना अवमान खटल्यात उपस्थित न राहण्याची सवलत

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचे चिरंजीव अमित सिब्बल यांच्यामार्फत दाखल केलेल्या अवमान खटल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयात हजर न राहण्याची कायमस्वरूपी सवलत दिली आहे.

न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांनी म्हटले, की जर केजरीवाल यांच्या अनुपस्थितीमुळे खटल्याला विलंब होत असेल तर कनिष्ठ न्यायालयाला आदेशात बदल करण्याची मुभा आहे. तसेच "आप' नेत्यास जेव्हा गरज भासेल तेव्हा उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. आपल्या गैरहजेरीत होणाऱ्या खटल्याच्या सुनावणीला आक्षेप नसेल, अशा प्रकारचे शपथपत्र न्यायालयात सादर करावे, असे न्यायालयाने "आप' नेत्याला सांगितले. यानुसार केजरीवाल यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलाने न्यायालयाने घातलेल्या अटीशी सहमती दर्शविली.

Web Title: Kejriwal exemption is not present contempt case