केजरीवाल हे लादेन बनले असते 

केजरीवाल हे लादेन बनले असते 

नवी दिल्ली : गालावर थप्पड मारणारी व्यक्ती जर दहशतवादी ठरत असेल, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ओसामा बिन लादेन बनायला हवेत, अशी उपहासात्मक टीका आम आदमी पक्षाचे (आप) बंडखोर नेते कपिल मिश्रा यांनी मंगळवारी (ता. 6) केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) 'अभाविप'च्या शाखेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. "केवळ 'जेएनयू'तूनच नक्षलवादी किंवा साम्यवादी बाहेर पडत नाहीत, तर 'आयआयटी'तूनही ये येतात. पुलवामा हल्ल्यातील आरोपी अदिल अहमद दर हा पोलिसांनी थोबाडीत मारल्यानंतर दहशतवादी बनला, असे काही जण सांगतात. पण, जर एका थप्पडमुळे कोणी दहशतवादी बनत असेल, तर केजरीवाल हे ओसामा बिन लादेन झाले असते,'' असे ते म्हणाले. 

देशात 2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्ली व हरियाणातील सार्वजनिक सभांमध्ये काही जणांनी केजरीवाल यांना थप्पड मारल्याचे तीन प्रसंग घडले. यात एका रिक्षाचालकाने त्यांना भेटून माफीही मागितली होती. या प्रकरणांत केजरीवाल यांनी भाजपला जबाबदार ठरविले होते. 

छद्मी उदारमतवादी हे दुटप्पी असतात. युद्ध नको असा सूर ते लावतात, तर दुसरीकडे हवाई हल्ल्यांची सत्यतेवर ते प्रश्‍न उपस्थित करतात आणि यात कोणीही मारले गेले नसल्याचा दावा करतात. जर, आपली 12 जेट विमाने तेथे जाऊन आली आणि त्यांनी कोणालाही मारले नाही, तर पंतप्रधान मोदी यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा. 
- कपिल मिश्रा, 'आप'चे बंडखोर नेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com