सुदृढ आरोग्यासाठी केरळ उत्तम!

पीटीआय
बुधवार, 26 जून 2019

निगर्साचा वरदहस्त लाभलेल्या केरळला मनःशांतीसाठी अनेकजण भेट देत असतात. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रफुल्लित होऊन शरीराला ऊर्जा मिळते.

नवी दिल्ली : निगर्साचा वरदहस्त लाभलेल्या केरळला मनःशांतीसाठी अनेकजण भेट देत असतात. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रफुल्लित होऊन शरीराला ऊर्जा मिळते. यामुळेत देशातील आरोग्य निर्देशांकातही केरळने बाजी मारत प्रथम स्थान पटकावले आहे. याच वेळी संपूर्ण देशाचे केंद्रबिंदू असलेल्या उत्तर प्रदेशचे आरोग्य मात्र खालावलेले असल्याचे दिसून येते. 

निती आयोगाने दुसऱ्या आरोग्य निर्देशांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या साथीने आणि जागतिक बॅंकेच्या मदतीने हा अहवाल तयार केला आहे. 2015-16 (आधार वर्ष) ते 2017-18 (संदर्भ वर्ष) या वर्षांचा आढावा घेतला आहे. यासाठी आरोग्याचे 23 निर्देशांक ठरविण्यात आले होते. देशातील 21 मोठी राज्ये, आठ लहान राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य पाहणी करण्यात आली. 2018 मध्ये आरोग्य निर्देशांकाचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला होता. यासाठी 2014-2015 हे आधारभूत वर्ष आणि 2015-16 हे संदर्भ वर्ष गाह्य धरलेले होते. 

नव्या अहवालात केरळचा आरोग्य निर्देशांक सर्वांत जास्त असल्याचे नमूद केले आहे. आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमध्ये आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रगतिकारक कामगिरीच्या कसोटीवर मोठ्या राज्यांमध्ये हरियाना, राजस्थान आणि झारखंड ही राज्ये पहिल्या तीन क्रमांकांत आहेत. 

पहिली सहा मोठी राज्ये व त्यांचा आरोग्य निर्देशांक 
76-55 
केरळ 

65.21 
पंजाब 

63.38 
तमिळनाडू 

61.99 
गुजरात 

61.20 
हिमाचल प्रदेश 

61.07 
महाराष्ट्र 

पहिली सहा लहान राज्ये 

73.70 
मिझोराम 

57.78 
मणिपूर 

56.83 
मेघालय 

53.20 
सिक्कीम 

53.13 
गोवा 

49.51 
अरुणाचल प्रदेश 

केंद्रशासित प्रदेश 
65.79 
लक्षद्वीप 

52.27 
चंडीगड 

50.02 
दिल्ली 

50.00 
अंदमान-निकोबार 

47.48 
पुद्दुचेरी 

36.10 
दमण-दीव 

34.64 
दादरा-नगर हवेली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keral is Good Place for Helth