केरळमध्ये रॅगिंगप्रकरणी 21 विद्यार्थी निलंबीत

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मल्लापुरम (केरळ)- येथील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंगप्रकरणी 21 विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

मल्लापुरम येथे असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील 21 वरिष्ठ विद्यार्थ्यांनी 40 कनिष्ट विद्यार्थ्यांवर रॅगिंग केले होते. या विद्यार्थ्यांना त्यांनी कपडे धुण्याबरोबरच शौचालयल साफ करण्यास भाग पाडत होते. या विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही माहिती पुढे आहे. चौकशीदरम्यान रॅगिंग झाल्याचे उघड झाले होते. महाविद्यालयाने 21 विद्यार्थ्यांना निलंबीत केले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, कोट्यायम येथील सरकारी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे कपडे काढून त्याचा छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Kerala: 21 Students Suspended After Over 40 Allege Ragging