केरळमध्ये जपानी महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

कोवलम- केरळमधील कोवलम जिल्ह्यामध्ये एका 35 वर्षीय जपानी महिलेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मूळचा कर्नाटकातील असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. तेजा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजा याचे कुटुंबीय कोवलम येथे हस्तकलेचे दुकान चालवतात, असे पोलिसांनी सांगितले. 

येथील हॉटेलच्या खोलीत बलात्कार पीडित जपानी महिला ही रक्तप्रवाह होऊन जखमी अवस्थेत पडलेली आढळून आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने सॅट रुग्णालयात हलविले. ही महिला शुक्रवारीच कोवलम येथे आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
 
Web Title: Kerala: 25-year-old arrested for raping a Japanese tourist