केरळमध्ये पावसामुळे 34 हजार जणांचे स्थलांतर

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

केरळमध्ये गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, सखल भागातील सुमारे 34 हजार नागरिकांना तात्परत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. 
 

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, सखल भागातील सुमारे 34 हजार नागरिकांना तात्परत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. 

पूर नियंत्रण केंद्राकडून दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील 8 हजार 33 कुटुंबांतील 34 हजार 693 नागरिकांना 265 निवारा केंद्रात हलविले आहे. 9 जुलैपासून मॉन्सूनचा पाऊस राज्यात सक्रिय झाला. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले असून सहा जण बेपत्ता आहेत. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने कोट्यायम व अलाप्पुझा या जिल्ह्यातील गावे पाण्याखाली आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. गुरुवारपर्यंत (ता.19) पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

Web Title: In Kerala 34 thousand people migrated due to rains