केरळ विधानसभेत गदारोळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या घटनांवरून विरोधक आक्रमक

तिरुअनंतपूरम: केरळ विधानसभेत आज मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या मुद्यावर केलेल्या निवेदनावरून जोरदार गदारोळ झाला. सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी यूडीएफच्या आमदारांमध्ये जवळजवळ संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.

हा गदारोळ सभागृहातील शून्य प्रहरादरम्यान झाला. त्या वेळी सभागृहात तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या नुकत्याच घडलेल्या घटनांवर यूडीएफच्या वतीने मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावाच्या ठरावावर चर्चा सुरू होती. या घटनांमध्ये काल (बुधवारी) कोचीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मरीन ड्राइव्हवर प्रेमीयुगुलांना मारहाण केल्याच्या घटनेचाही समावेश होता.

ही चर्चा संपण्याच्या मार्गावर असताना विजयन यांनी कोचीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांना विरोधकांनीच पाठविले होते, अशी शंका व्यक्त करताच सभागृहात गोंधळाला सुरवात झाली.

यूडीएफच्या काही सदस्यांनी सभागृहात मध्यभागी बैठक मांडून कोचीतील घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या विरोधात निदर्शने केली. पिनाराई यांच्या वक्तव्यावरूनही हे सदस्य आणखी संतप्त झाले.

मुख्यमंत्र्यांना सुरक्षा कवच
विरोधी पक्षाचे काही सदस्य मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या दिशेने धावले, त्या वेळी एलडीएफच्या आमदारांनी तातडीने पिनाराई यांच्या बाजूला सुरक्षा कवच निर्माण केले. दोन्ही पक्षांदरम्यान खूप वेळा वादविवाद सुरू होता. मुख्यमंत्रीही यूडीएफच्या आमदारांकडे पाहून इशारा देत असल्याचे दिसून आले, एवढा हा वाद वाढला होता.

Web Title: Kerala Assembly