पोलिसांच्या ताब्यात असाताना BMS च्या कार्यकर्त्याचा मृत्यू; भाजपचा संप

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) कार्यकर्त्याचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संप पुकारला आहे.

कासारगोड (केरळ) - सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) कार्यकर्त्याचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संप पुकारला आहे.

शुक्रवारी पोलिसांनी संदीप नावाच्या भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले होते. "सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असल्याची तक्रार मिळाल्याने आम्ही भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यासह इतर चार जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर संदीपला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला आम्ही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाला', अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी त्यांच्या वाहनामध्ये संदीपला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप संदीपच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाने या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संप पुकारला आहे.

Web Title: Kerala: BMS activist dies in police custody, BJP calls for strike