Kerala Floods : अम्मुमॉं वाचली; पण संसार वाहून गेला...!

Ammuma
Ammuma

कोची : मध्य केरळातल्या भल्यामोठ्या पिची धरणाच्या पायथ्याला नलाई गाव. इथल्या अम्मुमॉं म्हणजे आजी अंबिका गोपालन. त्यांचं वय 62 वर्ष. अविवाहित असलेल्या अम्मुमॉं पाच ते सहा घरांमध्ये धुणीभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करते. तिनेदेखील छोटेसे घर उभारले आहे; पण 16 ऑगस्टला पहाटे अचानक पाणी घरात शिरल्यामुळे आयुष्यभर कष्ट करून जमविलेल्या वस्तू वाहून गेल्या. बघता बघता पाणी आठ ते दहा फूट उंचीपर्यंत वाढलं. अखेर कोणीतरी अम्मुमॉंला घरातून सुरक्षित ठिकाणी नेले. ती बचावली; पण तिचं घर तिला वाचविता आलं नाही

आता महापुराचे पाणी ओसरत असून, अम्मुमॉं स्वतःला सावरतेय. घर सावरण्यासाठी ती धडपडतेय. आधीच मोडकळीस आलेल्या घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. हे तडे पाहून अम्मुमॉं घाबरली आहे. आयुष्यभर राबत पै-पै जमवून बनविलेल्या घराची अवस्था पाहून त्यांना पुनःपुन्हा रडू कोसळतंय. गावातील मुले तिला आधार देताहेत. डोळ्यांना फारसं दिसत नसतानादेखील अम्मुमॉं दिवसभर घरासमोरील अंगणाची साफसफाई करीत होती. या घटनेमुळे ती सध्या कामाला जात नाही. घर उभे करण्यासाठी ती घरीच असते, त्यामुळे सध्या तिच्यापुढे खाण्यापिण्याचाही प्रश्‍न आहे. तिच्यापर्यंत कोणतीही मदत पोचलेली नाही. मदत मिळू शकते, हे देखील तिला ठाऊक नाही. तिला आधार हवा आहे तो माणुसकीचा आणि आपुलकीच्या भावनेचा. 

पाच दिवस घरात पाणी 
आमच्याशी बोलताना पाणावलेल्या डोळ्यांनी अम्मुमॉं म्हणाली, ""खूप कष्टानं घर उभारून वस्तू घेतल्या होत्या; पण पाण्यात सर्व वाहून गेलं. पाच दिवस माझ्या घरात पाणी होते, अजूनही मला भीती वाटत आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com