केरळमधील पुरात 174 जणांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

राज्यातील पथनमतित्ता या जिल्ह्यातील कोझेनचेरी, अरनमुला आणि रन्नी या गावातील लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे या गावांतील लोक घरातच अडकून पडले आहेत.

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत सुमारे 174 जणांचा मृत्यू झाला. तर 8 हजार कोटींचे नुकसान झाले. या बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत.

केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, आत्तापर्यंत 174 जणांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीपासून बचावासाठी 'एनडीआरएफ'च्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची आणखी एक तुकडी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील पथनमतित्ता या जिल्ह्यातील कोझेनचेरी, अरनमुला आणि रन्नी या गावातील लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे या गावांतील लोक घरातच अडकून पडले आहेत. तसेच राज्यातील काही जिल्ह्यातील पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक गेली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे मदतीची विनंती केली आहे.

Web Title: Kerala floods kill 174 people