घोड्यावर बसून मुलगी निघाली परिक्षेला... (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
सोमवार, 8 एप्रिल 2019

कृष्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय झाला आहे. ट्विटरवरून अनेकांनी व्हिडिओ रिट्विटही केला आहे.

तिरुअनंतपुरम (केरळ): घोड्यावर बसून परिक्षेला निघालेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्स संबंधित व्हिडिओ व्हायरल करत असून, राज्यामध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

केरळमधील सीए कृष्णा ही मला (जि. थ्रिसूर) या गावात राहणारी विद्यार्थिनी आहे. परिक्षाला जाताना प्रवासासाठी तिने घोड्याचा वापर केला आहे. घोड्यावर बसून जात असताना तिचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

कृष्णा म्हणाली, 'मला घोडेस्वारीची आवड आहे. परिक्षेचा माझा शेवटचा पेपर होता. यामुळे शाळेत जाण्यासाठी घोड्यावरून जाण्याचे ठरविले. अनेकांनी मला घोड्यावरून न जाण्याचा सल्ला दिला. परंतु, मी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. घोड्यावरून जात असताना अनेकजण माझ्याकडे पाहात होते. नववीला असतानाही शेवटच्या पेपरला घोड्यावरूनच गेलो होतो. माझ्या घरी दोन घोडे आहेत. मला घोडेस्वारीची आवड असल्यामुळे वडिलांनी मला हे घोडे बक्षिस म्हणून दिले आहेत.'

दरम्यान, कृष्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय झाला आहे. ट्विटरवरून अनेकांनी व्हिडिओ रिट्विटही केला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या ट्विटवर म्हटले आहे, 'हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल पाहिजे. कारण हा सुध्दा अतुल्य भारताचा एक भाग आहे. कोणी त्रिशूरमध्ये राहणाऱ्या या मुलीला कोणी ओळखता का? मला माझ्या मोबाईलमध्ये तिचा आणि तिच्या घोड्याचा फोटो स्क्रिन सेव्हर म्हणून ठेवायचा आहे. तिच्या शाळेत जाण्याच्या दृश्याने मला भविष्यासाठी आशावादी बनविले आहे.'

Web Title: Kerala girl who went to her Board exam riding a horse