Transgender Lawyer: बनली पहिली ट्रान्सजेंडर वकील, केरळच्या पद्मलक्ष्मीचं होतंय कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kerala Got Its First Transgender Lawyer Padma Lekshmi Enrolled as a Lawyer

Transgender Lawyer: बनली पहिली ट्रान्सजेंडर वकील, केरळच्या पद्मलक्ष्मीचं होतंय कौतुक

देशात आता ट्रान्सजेंडर्सनी वकिलीच्या क्षेत्रात पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. ट्रान्सजेंडर पद्मा लक्ष्मी केरळच्या पहिल्या वकील ठरल्या आहेत. कोर्टात सराव करण्यासाठी पद्मा यांनी रविवारी 19 मार्च रोजी बार कौन्सिलमध्ये नावनोंदणी केली आहे. बार कौन्सिलमध्ये नाव नोंदवल्यानंतर रविवारीच पद्मा लक्ष्मी यांना सरावासाठी नावनोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.

केरळच्या बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नावनोंदणी होणारी पद्मा लक्ष्मी ही पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरली आहे. केरळच्या बार कौन्सिलने रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात वकील म्हणून नावनोंदणी केलेल्या १,५०० हून अधिक कायदा पदवीधरांपैकी ती एक होती.

भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर जज बनलेल्या जोयिता मंडलनंतर पद्मा लक्ष्मीच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मंडल यांची 2017 मध्ये पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथील लोकअदालतीमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आमदार राजीव यांनी इंस्टाग्रामवर मल्याळममध्ये एक पोस्ट लिहिली आहे, यामध्ये त्यांनी म्हटले, "जीवनातील सर्व अडचणींवर मात करून केरळमधील प्रथम ट्रान्सजेंडर वकील म्हणून नोंदणी करणाऱ्या पद्मा लक्ष्मीचे अभिनंदन. प्रथम असणे हा नेहमीच इतिहास असतो." सर्वात कठीण यश. ध्येयाच्या मार्गावर कोणतीही पहिली गोष्ट नाही.

पवन यादव यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या तर देशातल्या दुसऱ्या ट्रान्सजेंडर वकील म्हणून ओळखले जात आहे.

टॅग्स :Kerala