'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारचः केंद्रीय मंत्री

Union Minister Anantkumar Hegde
Union Minister Anantkumar Hegde

नवी दिल्लीः केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असून, हा तर 'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारच आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे.

हेगडे म्हणाले, 'शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. केरळमधील डाव्या विचारधारेच्या सरकारने समाजभावनेचा विचार करणे अपेक्षित होते. परंतु, केरळ सरकारचे हे पुर्णपणे अपयश आहे. दिवसाढवळ्या हिंदूंवर झालेला हा बलात्कारच आहे. आपण हे बदलायला हवे.'

10 ते 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. मात्र, या आदेशानंतरही महिलांच्या मंदिर प्रवेशाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. 1) केरळमध्ये मानवी साखळी बनवणाऱ्या महिलांवर भाजप-आरएसएसच्या काही कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. शिवाय, प्रसारमाध्यमे व पोलिसांवरही दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सनातनी मंडळींनी महिलांच्या सबरीमला मंदिर प्रवेशाला विरोध केला आहे. शिवाय भाजपनेही कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन महिलांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. या मुद्द्यावरुन आज केरळ बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, दोन महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर गाभाऱ्यात ‘शुद्धीकरण विधी’ करण्यात आला. ‘‘10.52 वाजता शुद्धीकरण विधीसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले,’’ असे मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवरारू यांनी सांगितले. मंदिर प्रवेशबंदी हा महिलांशी भेदभाव नसून, ती परंपरा म्हणून मानावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com