केरळ सरकार सुरू करणार पब 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

केरळ राज्यात रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदारांना चांगले हॉटेल, पब आदी सुविधा नसल्याने केरळ सरकार स्वतः हॉटेल आणि पब सुरू करणार आहे.

थिरुअनंतपुरम : केरळ राज्यात रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदारांना चांगले हॉटेल, पब आदी सुविधा नसल्याने केरळ सरकार स्वतः हॉटेल आणि पब सुरू करणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी याबाबतची घोषणा केली आहे. रविवारी प्रसारित झालेल्या दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

केरळ राज्यातील यापूर्वीच्या सरकारने दारूबंदी करण्याच्या हेतूने पंचतारांकित श्रेणीखालील जवळपास 712 बार बंद केले होते; मात्र यातील अनेक बार दारूच्या दुकानात रूपांतरित झाले. त्यामुळे या दुकानांबाहेरील ग्राहकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.

आयटी क्षेत्रातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करतात. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना आणखी सोयी पुरवण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलल्याचे विजयन यांनी सांगितले. 
 

web title : Kerala government will start pub


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala government will start pub