'ती'चे दुसऱ्या पुरुषासोबत लैंगिक संबंध असू शकतात, पण.. - हायकोर्ट

वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला होता.
Frustrated with wife for denying sex man chops off his genitals
Frustrated with wife for denying sex man chops off his genitals

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवताना न्यायमूर्ती आर.नारायण पिशरादी यांनी महत्वाचं भाष्य केलंय. हा आरोपी म्हणजे याच पीडित मुलीचा पिता आहे. पीडितेने तिचे दुसऱ्या पुरुषासोबत लैंगिक संबंध असल्याचं कबूल केलं, तरी पीडितेच्या साक्षीच्या विश्वासार्हतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, आरोपीने पीडितेचे अन्य पुरुषासोबत शारीरिक संबंध असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. तसेच तिला अन्य पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सवय असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायालयाने आरोपीच्या वकिलांनी केलेले आरोप फेटाळून लावत पीडितेच्या चारित्र्याचा बचाव केला. 'बार आणि बेंच'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. केरळमधील अल्पवयीन मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला होता. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर घटनेला वाचा फुटली. पीडितेने आई आणि मावशीला अत्याचाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी मुलीसह पोलिसांकडे धाव घेतली. डीएनए चाचणीतही वडिलांनी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले.

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केरळ हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पीडित मुलीने पुरावे सादर केले आहेत. याकडे आरोपीवरील संशयाप्रमाणे पाहण्याची आवश्यकता नाही. पीडित मुलीने यापूर्वी अन्य पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले किंवा तिला लैंगिक संबंध ठेवण्याची सवय असली तरी या प्रकरणातील हा महत्त्वाचा मुद्दा नाही. या आधारे आरोपीला दोषमुक्त करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. इथे आरोपीविरोधात खटला सुरूये, पीडितेविरोधात नाही असेही न्यायालयाने नमूद केले.

मुलीची जबाबदारी असलेल्या बापानेच तिच्यावर बलात्कार करणं म्हणजे गुराख्याने शिकारी होण्यापेक्षा वाईट आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com