नशीब कसं फळफळलं पाहा; लॉटरी अन् हंडा...

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

केरळमधील एका व्यक्तीचे नशीब अक्षरशः फळफळले आहे. प्रथम सहा कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि आता शेतामध्ये 2 हजार 595 नाण्यांची भरलेला एक हंडा सापडला आहे. बी. रत्नाकर पिल्लई (वय 66) असे नशीब बदललेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तिरुअनंतपुरमः केरळमधील एका व्यक्तीचे नशीब अक्षरशः फळफळले आहे. प्रथम सहा कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि आता शेतामध्ये 2 हजार 595 नाण्यांची भरलेला एक हंडा सापडला आहे. बी. रत्नाकर पिल्लई (वय 66) असे नशीब बदललेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पिल्लई यांना जानेवारीमध्ये सहा कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. लॉटरीच्या पैशातून त्यांनी किलिमनूरमध्ये शेती खरेदी केली. शेतामध्ये श्रीकृष्णाचे मंदिर आहे. शेतामध्ये बटाट्याचे पीक आहे. शेतामध्ये काम करत असताना अचानक एक हंडा सापडला. संबंधित हंडा 100 वर्षे दुना आहे. या हंड्यामध्ये 2 हजार 595 नाणी आढळून आली. या नाण्यांचे वजन 20 किलो 40 ग्रॅम एवढे आहे. सर्व नाणी तांब्याची असून, ही नाणी त्रावणकोर साम्राज्यातील असल्याचे समजते. या नाण्यांची किंमत समजू शकली नाही. पिल्लई यांनी ही नाणी सरकारकडे जमा केली आहेत.
सध्या ही नाणी तपासमीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. नाणी स्वच्छ केल्यावर यांची किंमत समजू शकेल. ही नाणी त्रावणकोरमधील दोन राजांच्या शासन काळात वापरली जात होती. यातील पहिला मूलम थिरूनल राम वर्मा हा होता. त्यांचा शासन काळ 1885 ते 1924 दरम्यान होता. तर दुसरे राजा चिथिरा थिरूनल बाला राम वर्मा हे होते. हे त्रावणकोरचे शेवटचे शासक होते. त्यांनी 1924 ते 1949 दरम्यान शासन चालवले, , असे तज्ज्ञांनी सांगितले.
पिल्लई म्हणाले, नाणी सापडल्यानंतर आनंद झाला. पण, ही सर्व नाणी सरकारकडे जमा केली आहेत. या नाण्यांची किंमत किती हे सुद्धा जाणून घेतले नाही. पण, नशिब कसे बदलते, याचा अनुभव घेत आहे.'

दरम्यान, पिल्लई यांच्या शेतामध्ये हंडा सापडल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. शिवाय, पिल्लई यांच्या नशिबाची चर्चा सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala man finds 2595 ancient coins on land bought from Rs 6 crore lottery prize