आई, तुला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा; मुलाचे भावनिक पत्र...

Kerala man pens emotional note for mother on her second marriage
Kerala man pens emotional note for mother on her second marriage

तिरुवनंतपुरमः केरळमधील कोल्लम येथील एका महिलेने दुसरा विवाह केला असून, तिच्या मुलाने आईसाठी फेसबुकवर भावनिक पत्र लिहीले आहे. या पोस्टवर नेटिझन्सनी हजारो प्रत्रिक्रिया नोंदविल्या असून, अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गोकुळ श्रीधर या मुलाने आपल्या आईच्या दुसऱ्या विवाहानंतर भावनिक व ह्रदयस्पर्शी पोस्ट लिहीली आहे. ही पोस्ट वाचून नेटिझन्स भावूक झाले आहेत. मल्याळम भाषेत असणाऱ्या या ह्रदयस्पर्शी पोस्टमध्ये गोकुळ याने आपल्या आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, आईचा दुसऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. अनेकांनी नवदांपत्याचे कौतुक केले आहे. गोकुळ याच्या फेसबूक पोस्टमधून त्यांच्या आईने आयुष्यात खूप हालअपेष्टा सहन केल्याचे कळत आहे.

गोकुळ याच्या आईला पहिल्या पतीकडून घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले होते. फक्त आपल्यासाठी आईने हे सर्व सहन केल्याची खंत गोकुळला वाटत होती. आपल्या मनावर एक ओझं घेऊन तो जगत होता. पण, आईने नव्या आयुष्याला सुरुवात केली तेव्हा गोकुळ यांनी आपण आनंदी असून, यापेक्षा दुसरी सुखावणारी कोणतीच गोष्ट नाही असे फेसबुकवर म्हटले आहे.

गोकुळ म्हणतो, 'ज्या महिलेने माझ्यासाठी तिचे सारे सुख बाजूला ठेवले. तिने पहिल्या पतीकडून अनेक यातना सहन केल्या आहेत. जेव्हा तिला मारहाण व्हायची, डोक्यातून रक्त वाहायचे तेव्हा अनेकदा तू हे का सहन करत आहेस हे मी तिला विचारायचो. यावेळी अनेकदा मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी सहन करत असल्याचे ती सांगायची, हे मला स्पष्टपणे आठवते. मी तिच्यासोबत घर सोडलं तेव्हा मी या सर्व क्षणांचा विचार केला. जिने माझ्यासाठी सर्व तरुणपण घालवले, त्या माझ्या आईची अनेक स्वप्नं आहेत. अजून खूप मोठी उंची तिला गाठायची आहे. मला अजून काही बोलायचे नाही. ही अशी एक गोष्ट आहे जी लपवता कामा नये, असे मला सारखं वाटत होते. आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.'

'माझ्या आईचे हा दुसरा विवाह आहे. याबद्दल लिहावे की नाही याबद्दल मी खूप विचार केला. कारण आजही अनेकांना दुसरा विवाह पटत नाही. अनेकजण संशयी, दया आणि द्वेष या नजरेतून पाहतात. पण जरी तुम्ही पाहिले तरी फरक पडणार नाही. गोकुळने भावनिक पोस्ट अपलोड केल्यानंतर हजारो प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या आहेत. फेसबुकवर अशा पद्धतीने आपल्याच आईच्या दुसऱ्या विवाहाबद्दल भावना शेअर करताना गोकुळला भीती वाटत होती. समाजातील काही ठराविक लोक हे सकारात्मकपणे घेतील की नाही? याबाबत शंका होती. पण, नंतर लपवण्यासारखे काही नसून, उलट ज्यांची विचासररणी छोटी आहे त्यांनी हे वाचलेच पाहिजे, असा विचार करत पोस्ट लिहिली आहे,' असे गोकुळने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com