केरळमध्ये 52.5 लाखांच्या नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

कोझीकोडमधील वल्लुवामपुरम येथून फझलूर रेहमान (वय 30) व उन्नीमोई (वय 52) या दोघांना 50 लाख रुपयांसह अटक करण्यात आली आहे.

कोझीकोड - केरळमधील कोझीकोड जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून 52.5 लाख रुपयांच्या 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोझीकोडमधील वल्लुवामपुरम येथून फझलूर रेहमान (वय 30) व उन्नीमोई (वय 52) या दोघांना 50 लाख रुपयांसह अटक करण्यात आली आहे. बसमधून कोझीकोडहून मांजेरी येथे ते जात होते. तपासणी दरम्यान बॅगमधून हे पैसे जप्त करण्यात आले. या दोघांनाही या पैशाची माहिती देता आली नाही. यांची चौकशी करण्यात येत आहे.

तर, दुसरीकडे मांजेरी पोलिस ठाण्यांतर्गत वाहनांची तपासणी सुरु असताना दुचाकीवरून अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना एकाला अटक करण्यात आली. जमशेर असे या युवकाचे नाव आहे.

 

Web Title: Kerala: New currency worth Rs 52.5 lakhs seized; 3 held

टॅग्स