बिगरहिंदूंना मंदिरात प्रवेश द्या; काँग्रेस नेत्याची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

तिरुअनंतरपुरम: बिगरहिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी केरळमधील काँग्रेसचे नेते अजय थरयिल यांनी केली असून, यावरून राज्यभरात चर्चेला तोंड फुटले आहे.

थरयिल हे त्रावणकोर देवस्थान मंडळचे सदस्य असून, त्यांनी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर यासंदर्भात मजकूर लिहिला आहे. यात त्यांनी मंदिर आणि मूर्तीपूजेमध्ये विश्‍वास असलेल्या व्यक्तींना सर्व मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी बिगरहिंदूंना मंदिरात प्रवेश देण्याची अंमलबजावणी अशा प्रकारे एकतर्फी करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

गोपालकृष्णन म्हणाले, की धर्माच्या नावाखाली मंदिरामध्ये प्रवेश बंदी नसून, यात शबरीमला देवस्थानचाही समावेश आहे; मात्र काही मंदिरांमध्ये मर्यादित प्रवेश आहे. याबाबत पुजारी मंडळ, देवस्थान सल्लागार समिती आणि देवस्थान मंडळांचे पदाधिकारी यांच्यासमोर चर्चा व्हायला हवी. त्यांनरत यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा. त्राणकोरसह कोचीन, मलबार, कूडलमनिकायम आणि गुरूवायूर अशी चार देवस्थान मंडळे राज्यात आहेत.

प्रवेशाची मागणी अनावश्‍यक : देवस्थानमंत्री
केरळचे पर्यटन आणि देवस्थानमंत्री कडकामपल्ली सुरेंद्रन यांनी ही मागणी अनावश्‍यक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, की गुरुवायूर श्री कृष्ण मंदिर सोडल्यास केरळमधील सर्व मंदिरात बिगरहिंदूंना प्रवेश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, केरळमधील कोणतेही मंदिर प्रवेश देताना धर्माचा दाखला मागत नाही.

Web Title: kerala news Allow non-Hindus to enter the temple; Congress leader's demand

टॅग्स