''माझी जायची वेळ झाली, माझ्या मुलांची काळजी घ्या''

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

''सजी चेट्टा, मी आता जाण्याच्या मार्गावर आहे. मला असे वाटत नाही, तुम्हाला मी पुन्हा कधी पाहू शकते. मला माफ करा. आपल्या मुलांची नीट काळजी घ्या.'' 

तिरुअनंतपुरम : ''माझी जायची वेळ झाली आहे. माझ्या मुलांची काळजी घ्या'', असे केरळमधील एका तरुण परिचारिकेने मृत्यूपूर्वी आपल्या पतीला लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. संबंधित परिचारिका निपा व्हायरसने पीडित रूग्णावर उपचार करत असताना तिचा मृत्यू झाला. 

लिनी पुथूस्सेरी या 31 वर्षीय परिचारिकेचा यामध्ये मृत्यू झाला. ती सोमवारी निपा व्हायरसची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करत होती. लिनीला दोन मुले असून, एक सात तर दुसरा दोन वर्षाचा मुलगा आहे. ती कोझिकोडे येथील पेरांबरा रूग्णालयात निपा व्हायरसची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करत होती. तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात सांगितले, की ''सजी चेट्टा, मी आता जाण्याच्या मार्गावर आहे. मला असे वाटत नाही, तुम्हाला मी पुन्हा कधी पाहू शकते. मला माफ करा. आपल्या मुलांची नीट काळजी घ्या.'' 

याबाबत डॉ. दीपू सेबिन यांनी सांगितले, की परिचारिका लिनी ही निपाह व्हायरसबाधित रुग्णावर उपचार करत होती. ती संबंधित रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न करत होती. ती विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. 

दरम्यान, निपाह या व्हायरसमुळे आत्तापर्यंत 6 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या आजाराने पीडित रुग्णावर उपचार करताना मृत्यू झालेली लिनी ही परिचारिका आहे. 

Web Title: Kerala nurse lini taking care of Nipah patients dies