कोझीकोडमध्ये संघाच्या 3 स्वयंसेवकांवर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

या प्रकरणी पोलिसांनी सीपीएमच्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

कोझीकोड - केरळमधील कोझीकोड येथे शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तीन स्वयंसेवकांवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरएसएस आणि सीपीएममध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष सुरु आहे. अनेकवेळा हिंसक घटनाही घडल्या आहेत. आता कोझीकोडमध्ये संघाच्या तीन स्वयंसेवकांवर हल्ला झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सीपीएमच्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचे शीर कापून आणणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस देऊ असे म्हणणारे संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Kerala political violence: Now, 3 RSS men attacked in Kozhikode, 1 CPM worker arrested