'अमित शहा केरळमधील डावे सरकार पाडू शकत नाहीत'

vijayanp
vijayanp

पलक्कड : केरळमधील शबरीमला मंदिराबाबत वादग्रस्त चर्चा होत असतानाच केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी 'भाजप अध्यक्ष अमित शहांची ताकद ही केरळमधील डावे सरकार पाडायला कमी पडेल,' असे वक्तव्य केले आहे.

शनिवारी (ता. 27) अमित शहांनी, विजयन यांना शबरीमला मंदिराबाबत राजकारण करू नये, तसेच शबरीमलाबाबात केरळमधील लोकांच्या विश्वासाशी छेडछाड केल्यास भाजप, केरळ सरकार पाडेल अशी ताकीद दिली होती. त्यावर विजयन यांनी रविवारी (ता. 28) शहा व आरएसएसवर टीका करत, ते आमचे डावे सरकार कधीच पाडू शकत नाही, ज्यांचे शरिर पाण्याने बनले आहे, ते कधीच आमचे सरकार पाडू शकत नाहीत. शहा यांनी असे प्रकार गुजरातमध्येच करावेत अशी प्रतिक्रिया दिली. 

शहा यांनी बरेच प्रयत्न करूनही ते केरळमध्ये त्यांचा पाया भक्कम करू शकले नाहीत. त्यांनी कितीही यात्रा घेऊन केरळमध्ये सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न केले तरी ते करू शकत नाहीत, असेही विजयन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com