अल्पवयीन मुलावर अत्याचारप्रकरणी एका 'फादर'ला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

कोची- एका अल्पवयीन मुलावर जबरदस्ती करीत अनैसर्गिकरीत्या शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी केरळमधील एका फादरला आज (सोमवार) 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  

किंग्ज डेव्हिड इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक फादर बेसिल कुरियाकोस यांना भारतीय दंडविधानाच्या कलम 377 नुसार अटक करण्यात आली. पीडित मुलाच्या पालकांनी तक्रार दाखळ केल्यानंतर पोलिसांनी आरोपी फादरला अटक केली.

"पीडित दहावर्षीय मुलगा येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकतो. त्या मुलाचे वडील शाळेमध्ये त्याला भेटण्यासाठी आल्यावर त्याने हा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तक्रार दाखल केली," असे पोलिसांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 
 
Web Title: Kerala Priest Sent To 14 Days Police Custody For Having Sex With 10-Year-Old Boy