भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

सेपाहिजला (त्रिपुरा) : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या त्रिपुरातील मनीर होसेन (वय 23) या युवकाचा मलेशियातील रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने गुरुवारी केला. होसेन हा मधुपूर पोलिस स्थानकाअंतर्गत पुराथल राजनगर गावचा रहिवासी होता. तो 2018 मध्ये मलेशियाला गेला होता. तेथे तो हॉटेलमध्ये काम करीत होता. होसेनचे आजोबा अब्दुल रहीम म्हणाले की, नातवाच्या मृत्यूची बातमी मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.29) सकाळी फोनवरून दिली. होसेनचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.

सेपाहिजला (त्रिपुरा) : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या त्रिपुरातील मनीर होसेन (वय 23) या युवकाचा मलेशियातील रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने गुरुवारी केला. होसेन हा मधुपूर पोलिस स्थानकाअंतर्गत पुराथल राजनगर गावचा रहिवासी होता. तो 2018 मध्ये मलेशियाला गेला होता. तेथे तो हॉटेलमध्ये काम करीत होता. होसेनचे आजोबा अब्दुल रहीम म्हणाले की, नातवाच्या मृत्यूची बातमी मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.29) सकाळी फोनवरून दिली. होसेनचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. होसेनचा मृतदेह मलेशियाहून भारतात लवकर आणण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळमध्ये रुग्णावर उपचार
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केले. हा रुग्ण चीनमधील वुहान विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तो भारतात परतल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यात त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. त्याला रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

दिल्लीतील रुग्ण सुरक्षित
कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून नवी दिल्लीतील आरएमएल रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवलेल्या तीन रुग्णांना या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे चाचणीच स्पष्ट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. त्यांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. त्यात त्यांना "कोराना'चा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. चार दिवसांपूर्वी श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने हे तिघे स्वतः "आरएमएल'मध्ये दाखल झाले होते. चीनमधून परतणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. श्‍वसनातील संसर्गदोषाच्या समस्येवर माहितीसाठी पूर्णवेळ हेल्पलाइन उपलब्ध केली आहे.
Image result for corona virus one positive cases found in kerala
चीनमधून परतणाऱ्या प्रवाशांची "थर्मल' तपासणी करण्यासाठी विमानतळावर 21 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. यात गया, गुवाहाटी, विझाग, वाराणसी, गोवा, भुवनेश्‍वर आणि लखनौ येथील विमानतळांचा समावेश आहे. "एनआयव्ही'मध्ये आतापर्यंत देशभरातून 38 नमुने तपासण्यात आले आहेत. पुण्यासह अलेप्पी, बंगळूर, हैदराबाद आणि मुंबईतील प्रयोगशाळांमध्ये या विषाणूच्या चाचणीची सोय करण्यात आली आहे. दिल्ली, हरियाना, पंजाब आणि राजस्थानसह अन्य राज्यांमधील जे लोक चीनला जाऊन आले आहेत आणि ज्यांच्यात कोरोना व्हायरससारखी लक्षणे आढळली आहेत, त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

केंद्रीय आरोग्य पथक महाराष्ट्रात येणार
महाराष्ट्रातील दहा संशयित रुग्णांना तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसला प्रतिबंध आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक राज्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात 27 जणांना निरीक्षणाखाली ठेवले असून त्यातील दहा जणांची रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यातील सहाजण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात, तीन पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणि अन्य एक रुग्ण नांदेडच्या रुग्णालयात दाखल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerala reports first confirmed coronavirus case in India