जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून भागवतांनी केले ध्वजारोहण

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत आज (मंगळवार) सकाळी मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. मोहन भागवत यांना झेंडावंदन करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी प्रचंड विरोध केला. अखेर जिल्हाधिकाऱ्याचे आदेश न मानता भागवत यांनी झेंडा फडकवला.

कोची : केरळमधील एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहभागी होऊन झेंडावंदन केले.

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत आज (मंगळवार) सकाळी मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. मोहन भागवत यांना झेंडावंदन करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी प्रचंड विरोध केला. अखेर जिल्हाधिकाऱ्याचे आदेश न मानता भागवत यांनी झेंडा फडकवला. सरकारी अनुदान प्राप्त शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र सरकारी अनुदान प्राप्त होणाऱ्या शाळेत नेत्याच्या हस्ते झेंडावंदन करण्याची परवानगी नाही असे निवेदन जिल्हाधिकाऱ्याने शाळेला दिले होते. नियमांनुसार शाळेतील शिक्षक किंवा शाळेच्या प्रशासकीय विभागातील व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधीच्याच हस्ते झेंडा फडकावला जाऊ शकतो असे आदेश होते.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावत भागवत यांनी तिरंगा फडकावला. या शाळेला संघाकडून मदत होत असल्याने भागवत यांना ध्वजारोहणासाठी बोलविण्यात आले होते. 

Web Title: Kerala: RSS chief Mohan Bhagwat defies collector’s orders, unfurls tricolour at government school