Sun, May 28, 2023

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची कारला धडक; अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
Published on : 11 March 2023, 12:34 pm
केरळमध्ये वेगवान बस आणि कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कारचा चक्काचूर होऊन बस शेजारील कमानीला धडकली आणि यात कमान तुटून बसवर पडली नंतर बस चर्चमध्ये घुसली. हा अपघात केरळ मधील पथानमथिट्टा जिल्ह्यातील किझावल्लोरजवळ घडला आहे.
केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जिल्ह्यातील किझावल्लोरजवळ पांढऱ्या रंगाच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारला धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की कार आणि बस दोन्हीचा चक्काचूर झाला आणि बस चर्चची भिंत तोडून चर्चमध्ये घुसली. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.