'इसिस'मधील केरळचा युवक सीरियातील हल्ल्यात ठार

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

हा संदेश अफगाणिस्तानमधून आला होता. हाफिजुद्दीनबरोबर गेलेले इतर सर्व जण अद्यापही अफगाणिस्तानमध्येच असून परत येण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे समजते.

तिरुअनंतपुरम  : 'इसिस'मध्ये सहभागी होण्यासाठी केरळमधून गेलेल्या 21 जणांपैकी हाफिजुद्दीन (वय 24) या युवकाचा अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

हाफिजुद्दीन हा केरळच्या उत्तर भागातील कासारगोड येथील रहिवासी आहे. त्याच्या आईला काल (ता. 25) मोबाईलवर आलेल्या संदेशामध्ये तो मारला गेल्याचे म्हटले आहे. 'हाफिजुद्दीन हुतात्मा झाला आहे, आमची वेळ येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, इन्शाअल्लाह,' असे या संदेशात म्हटले होते.

तपास संस्थांच्या म्हणण्यानुसार, हा संदेश अफगाणिस्तानमधून आला होता. हाफिजुद्दीनबरोबर गेलेले इतर सर्व जण अद्यापही अफगाणिस्तानमध्येच असून परत येण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे समजते.

गेल्या वर्षी केरळमधून एकाच वेळी 21 जण बेपत्ता झाल्याने आणि ते 'इसिस'मध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याचे समजल्याने सामान्य नागरिकांना धक्का बसला होता. यातील बहुतेक जण उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.

Web Title: kerala youth who joined isis killed in syria