esakal | झिका व्हायरसचा धोका वाढतोय; एका दिवसात 5 नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

झिका व्हायरसचा धोका वाढतोय; एका दिवसात 5 नवे रुग्ण

भारतात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे.

झिका व्हायरसचा धोका वाढतोय; एका दिवसात 5 नवे रुग्ण

sakal_logo
By
सूरज यादव

तिरुवनंतपुरम - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असताना आता भारतात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे. केरळमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून गुरुवारी आणखी 5 जणांना याची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली आहे. केरळमध्ये नवीन 5 रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण 28 जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे.

केरळमध्ये गुरुवारी अनायरात दोन, कुन्नुकुझी, पट्टम या ठिकाणी प्रत्येकी एक झिका व्हायरसचा रुग्ण सापडला आहे. आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी बुधवारी सांगितलं होतं की, अनायराच्या तीन किलोमीटर परिसरात झिका व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. याठिकाणी डास नष्ट करण्यासाठी पावले उछलली जात आहेत.

हेही वाचा: आर्मी बेसजवळ भाजी विकणारा निघाला पाकिस्तानच्या ISIचा एजंट

झिका संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वैद्यकीय कार्यालयात एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तसंच डास नष्ट करण्यासाठी फॉगिंगचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.

तिरुवनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती बुधवारी देण्यात आली होती. याशिवाय राज्यातील एक डॉक्टर आणि इतर दोघांना आधी झिका व्हायरसचा ससंर्ग झाला होता.

हेही वाचा: देशद्रोह कायद्याची गरज आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलं होतं की, केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव हा अनपेक्षित नाही. कारण हा व्हायरस डेंग्यु आणि चिकन गुनिया पसरवणाऱ्या एडिस डासापासून पसरतो. अशा प्रकारच्या आजारांना रोखण्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

loading image