राजीव गांधी हत्या प्रकरण: नि:पक्ष चौकशीसाठी पंतप्रधांना पत्र 

पीटीआय
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात कथित मोठ्या कटाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) उत्तर मागविल्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणातील एका मुख्य साक्षीदाराने पंतप्रधानांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याविषयी, तसेच स्वतंत्र आणि नि:पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात रमेश दलाल या साक्षीदाराने म्हटले आहे, की मी जैन चौकशी आयोगाचा एक महत्त्वपूर्ण साक्षीदार होतो. राजीव गांधी यांच्या हत्येमागील कटाच्या योजनेची चौकशी करण्यासाठी हा आयोग स्थापन केला होता. यासंबंधी मी सीबीआयलाही पत्र पाठवून कटाच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला होता. 

दलालने मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की 19 एप्रिल 2016 रोजी पाठविलेल्या पत्रानुसार सीबीआयकडून कटाच्या योजनेविषयी एक पूरक आरोपपत्राची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयकडून उत्तर मागविले आहे. त्यामुळे प्रकरण तडीस नेण्यासाठी स्वतंत्र, तसेच नि:पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टीने आपण हस्तक्षेप करावा, अशी मी विनंती करत आहे.

Web Title: Key witness in Rajiv Gandhi assassination case writes to PM Narendra Modi to ensure fair probe