esakal | ४० फुटी गणपतीच्या विसर्जनाचा प्रश्न; तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात
sakal

बोलून बातमी शोधा

४० फुटी गणपतीच्या विसर्जनाचा प्रश्न; तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात

खैरताबाद गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुढच्या वर्षी मातीची मूर्ती तयार करण्यात येणार असून त्याची उंची ७० फूट इतकी असेल.

४० फुटी गणपतीच्या विसर्जनाचा प्रश्न; तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हैदराबाद - देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. तेलंगणात गणेश विसर्जनावरून प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात ४० फुटी गणेशाची स्थापना करण्यात आली असून त्याचे विसर्जन कसे करायचे याची चिंता तेलंगणा सरकारला लागून राहिली आहे. तेलंगणा सरकारने हुसैनसागरमध्ये प्लास्टर ऑफ पॅऱिसच्या मूर्ती विसर्जनाची परवानगी मागितली होती. याला उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आता सरकराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सरकारने म्हटलं की, किमान या वर्षीसाठी परवानगी देण्यात यावी.

जीएचएमसीचे अधिकारी आणि खैरताबाद गणेश उत्सव समिती दुसऱ्या पर्यायांचा विचार करत आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर ४० फुटी गणेश मूर्तीचे विसर्जन कसे करायचे यावर विचार सुरु आहे. दरवर्षी खैरताबादच्या गणपतीची मूर्ती ही एनटीआर मार्गावर विसर्जीत केली जाते. मात्र तेलंगणा हायकोर्टात आपली बाजू नीट मांडली नाही असा विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एम रामा राजू यांनी आरोप राज्य सरकारवर केला आहे. त्यांनी म्हटलं की, मूर्तींचे विसर्जन हे दरवर्षीनुसार हुसैनसागरमध्येच केलं जाईल.

हेही वाचा: हसन मुश्रीफांवर कारवाई नक्की होणार - किरीट सोमय्या

गणेशमूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न सोडवण्यासाठी मंगळवारी महापौर जी विजयलक्ष्मी यांनी खैरताबाद इथं भेट दिली होती. तेव्हा गणेश उत्सव समितीने असा निर्णय़ घेतला होता की, पुढच्या वर्षीपासून खैरताबाद गणेश मूर्तीचे विसर्जन इथेच करण्यात येईल. तर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुढच्या वर्षी मातीची मूर्ती तयार करण्यात येणार असून त्याची उंची ७० फूट इतकी असेल. महापौरांनीच मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची करण्याबाबत सुचवलं असं त्यांनी सांगितलं.

loading image
go to top