खानापूरात महालक्ष्मी यात्रोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

खानापूर - गेल्या वर्षभरापासून उत्सूकता लागुन राहिलेल्या महालक्ष्मी यात्रोत्सवाला आज (ता. २०) पासून प्रारंभ झाला. लाखो भाविकांच्या साक्षीने सकाळी सूर्योदयाला म्हणजे ६ वाजून ४९ मिनीटांनी महालक्ष्मीच्या विवाहसोहळ्याने यात्रेची सुरूवात झाली. यावेळी संपूर्ण शहरात जल्लोषी वातावरण आहे. 

खानापूर, जि. बेळगाव - गेल्या वर्षभरापासून उत्सूकता लागुन राहिलेल्या महालक्ष्मी यात्रोत्सवाला आज (ता. २०) पासून प्रारंभ झाला. लाखो भाविकांच्या साक्षीने सकाळी सूर्योदयाला म्हणजे ६ वाजून ४९ मिनीटांनी महालक्ष्मीच्या विवाहसोहळ्याने यात्रेची सुरूवात झाली. यावेळी संपूर्ण शहरात जल्लोषी वातावरण आहे. 

तालुक्याचे ठिकाण असलेल्या खानापूर शहराची महालक्ष्मी यात्रा ही केवळ तालुक्यासाठीच नाही तर परप्रांतीयांसाठीही औत्सुक्याचा विषय असतो. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून ही यात्रा चर्चेत होती. आज महालक्ष्मीच्या विवाह सोहळ्याने यात्रेला सुरूवात झाली. पहाटेपासूनच भाविकांनी शहरात गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्ता गर्दीने खुलून निघाला होता. नागरीकांना महालक्ष्मी मंदिरापर्यंत जाऊन विवाह सोहळा पाहणे शक्य नसल्याने शहराच्या विविध भागात स्क्रीन बसवून सोहळ्याचे थेट प्रक्षेपन करण्यात आले होते. 

शहरातील वाहतुक पूर्णत: बंद ठेऊन संभाव्य गर्दीवर नियंत्रण आणण्यात आले होते. सकाळी आठच्या सुमारास हर हर महादेवच्या जयघोषात महालक्ष्मीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. सायंकाळी देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यानंतर पुढील नऊ दिवस यात्रोत्सव चालणार आहे.

Web Title: Khanapur Mahalaxmi Yatroushav starts