अपहत भारतीयांची दक्षिण सुदानमध्ये सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

नवी दिल्ली,: दक्षिण सुदानमध्ये अपहरण करण्यात आलेल्या दोन भारतीयांची सुटका करण्यात आल्याचे आज सरकारच्या वतीने सांगण्यात आले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून भारतीयांच्या सुटकेची पुष्टी केली आहे.

दक्षिण सुदानमध्ये अपहरण करण्यात आलेल्या मिधून आणि एडवर्ड या भारतीयांच्या सुटकेची माहिती देताना आनंद होत असल्याचे सुषमा स्वराज्य यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी दक्षिण सुदानमधील आपले राजदूत श्रीकुमार मेनन यांनी केलेल्या प्रयत्नांची स्तुती करते, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

पेशाने अभियंता असलेल्या मिधून गणेश (वय 25) आणि ए. एडवर्ड (वय 40) यांचे आठ मार्च रोजी दक्षिण सुदानमध्ये अपहरण करण्यात आले होते. सुदान पीपल्स लिबरेशन आर्मीने या दोन भारतीयांचे अपहरण केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: kidnapped Indian released in South Sudan