esakal | सर्पदंशाने व्यक्तीची हत्या करणं हा नवा ट्रेंड - सर्वोच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

Snake

सर्पदंशाने व्यक्तीची हत्या करणं हा नवा ट्रेंड : SC

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : ''लोक सर्पप्रेमींकडून विषारी साप आणतात आणि सर्पदंश (snake bite) करून एखाद्या व्यक्तीला मारणे हा नवा ट्रेंड आहे'', असे सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) सुनावणीदरम्यान म्हटले आहे. राजस्थानमधील एका महिलेची सर्पदंश करून हत्या करण्यात आली. आरोपीच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने या ट्रेंडबद्दल उल्लेख केला आहे. तसेच आरोपीला जामीन देण्यास देखील सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

हेही वाचा: Pandora Papers : हरीश साळवेंनी विदेशात विकत घेतली कंपनी

कृष्णा कुमार मुख्य आरोपीसह सर्पप्रेमींकडे गेला होता. त्यांनी १० हजार रुपयांमध्ये साप विकत घेतला होता. त्यानंतर आरोपीला त्यांचा मित्र साप विकत का घेत होता याची कल्पना नव्हती. वैद्यकीय उपचारासाठी याची गरज असल्याचे त्या मित्राने सांगितले होते, असे वकील आदित्य चौधरी यांनी आरोपीची बाजू मांडताना म्हटले. आरोपी हा इंजिनिअरींचा विद्यार्थी असून त्याच्या भविष्याचा विचार न्यायालयाने करावा आणि त्याला जामीन द्यावा, अशी मागणी देखील यावेळी कऱण्यात आली. मात्र, न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

नेमकं काय आहे प्रकऱण?

२०१९ मध्ये सुनेने सासूची सापाचा दंश देऊन हत्या केल्याची घटना समोर आली होती. अल्पना असं सूनेचं नाव होतं, तर सासूचं नाव सुबोध देवी होतं. अल्पना आपल्याला सासूसोबत राहत होती. मात्र, सूनचे जयपूरमधील मनिष नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप होता. अल्पनाचा पती लष्कारात असल्याने या दोघीही एकट्या राहायच्या. तिच्या विवाहबाह्य संबंधाची सासूला माहिती मिळताच सासूने तिला बोलायला सुरुवात केली. आपल्या प्रेमामध्ये सासू अडसर येत असल्यामुळे तिने सासूच्या हत्येचा कट रचला. गेल्या २ जून २०१९ ला सुबोध देवी यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. घटनेच्या दीड महिन्यानंतर अल्पनाच्या सासरच्या लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांच्या नोंदीनुसार, घटनेच्या दिवशी 2 जून रोजी अल्पना आणि मनीष यांच्यामध्ये 124 कॉल करण्यात आले होते आणि 19 कॉल अल्पना आणि कृष्ण कुमार यांच्यामध्ये करण्यात आले होते. त्यानंतर अल्पना, मनीष आणि त्यांचा मित्र कृष्ण कुमार यांचा सुबोध देवीच्या हत्येत सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top