अधिक दहशतवादी मारणे म्हणजे यश नव्हे : उमर

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

"यूपीए' सरकारपेक्षा आपल्या सरकारने जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अधिक दहशतवादी मारले, हे सांगण्याचा "एनडीए' सरकार आटापिटा करत आहे. मात्र, यामुळे काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचार वाढण्यास त्यांच्या कालावधीत कसा हातभार लागला, हेच ते सांगत आहेत,' अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आज केली. हे यश नव्हे, लाजिरवाणे आहे, असेही उमर म्हणाले. 
 

श्रीनगर : "यूपीए' सरकारपेक्षा आपल्या सरकारने जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अधिक दहशतवादी मारले, हे सांगण्याचा "एनडीए' सरकार आटापिटा करत आहे. मात्र, यामुळे काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचार वाढण्यास त्यांच्या कालावधीत कसा हातभार लागला, हेच ते सांगत आहेत,' अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आज केली. हे यश नव्हे, लाजिरवाणे आहे, असेही उमर म्हणाले. 

एनडीए सरकारच्या कालावधीत अधिक प्रमाणात दहशतवादी मारले गेल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकताच केला. त्यावर जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उमर यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. "मंत्रीसाहेब, खरे म्हणजे तुमच्या काळात तुम्ही काश्‍मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार कसा वाढू दिला, याचीच कथा तुम्ही सांगत आहात. दहशतवाद्यांना मारण्याचे प्रमाण वाढणे हे काही यश नाही. काश्‍मीरमध्ये संघर्ष वाढला याबद्दल तुम्ही खजिल व्हायला हवे होते,' असे उमर यांनी म्हटले आहे. 

श्रीनगरमध्ये कडक तपासणी 
दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी श्रीनगर आणि इतर मुख्य शहरांमधील सुरक्षा वाढविली आहे. कोणताही दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून तपासणी नाक्‍यांवर कडक तपासणी होत आहे. कोणत्याही वाहनाची कधीही तपासणी होत असून, ओळखपत्र दाखविणे आवश्‍यक करण्यात आले आहे. 

Web Title: Killing more terrorists is not a succes says Omar