लोकसभेपूर्वी भाजपला झटका; खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Kirti Azad, Rahul Gandhi
Kirti Azad, Rahul Gandhi

पाटणा : भाजपमधून निलंबित झालेल्या खासदार कीर्ती आझाद यांनी आज (सोमवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आझाद यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. कीर्ती यांचे वडील भागवत झा आझाद बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यावेळी उपस्थित होते.

कीर्ती यांचे भाजपबरोबर वाद झाले होते. दिल्ली क्रिकेट संघटनेच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केली होती. सध्या ते दरभंगाचे खासदार आहेत. कीर्ती यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत 'अच्छे दिनां'ची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर नुकतेच काँग्रेसमध्ये आले आहेत. ते किशनगंजचे खासदार आहेत. भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्‍यता मावळल्यात जमा आहे. ते पुढे काय करणार, याचे औत्सुक्‍य असले तरी ते काँग्रेसमध्ये जातील, असा तर्क आहे. ते सध्या पाटणा साहेबचे खासदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com