शेतकऱ्यांचा मोर्चा लखनऊकडे; लखीमपुर घटनेविरुद्ध पुकारणार एल्गार पुकारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers Protest
लखनऊमध्ये शेतकरी लखीमपुर घटनेविरुद्ध पुकारणार एल्गार

लखनऊमध्ये शेतकरी लखीमपूर घटनेविरुद्ध पुकारणार एल्गार

लखनऊ: केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वर्षभर चाललेल्या या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी १९ तारखेला ही घोषणा केल्याने आंदोलन यशस्वी झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र जो पर्यंत हे कायदे संसदेत मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यातच शेतकरी आंदोलकांनी आपला मोर्चा आता आज लखनऊकडेही वळवल्याचं पाहायला मिळतंय.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकरी संघटनांकडून आज किसान महापंचायतीचे आयोजन केले गेले आहे. कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा करूनही शेतकऱ्यांनी कार्यक्रम रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण हे तीन कायदे मागे घेण्याव्यतिरीक्त MSP कायदा करा आणि लखीमपुर प्रकरणातील आरोपी गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी या मागण्या घेऊन शेतकरी लखनऊमध्ये एल्गार पुकारणार आहेत.

हेही वाचा: ...नाहीतर उत्तर प्रदेशचे रस्ते शाहीन बागेत बदलू - ओवैसी

दरम्यान, कायदा मागे घेण्याची घोषणा करूनही त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच जाहीर केले आहे. महापंचायतीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून मोठ्या संख्येने शेतकरी पोहोचण्याची अपेक्षा आहे.

loading image
go to top