शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!

वृत्तसंस्था
शनिवार, 21 डिसेंबर 2019

आधारकार्ड ठरले फायदेशीर

- पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरु

- सरसकट निधीचे वाटप

नवी दिल्ली : 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' या योजनेचा फायदा देशातील लाखो शेकऱ्यांना होत आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात विशिष्ट रक्कमही जमा केली जाते. मात्र, आता सरकारकडून दिलेला हा निधी पुन्हा परत घेण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून परत घेतला जात असून, केंद्रीय कृषी मंत्रालयाने आतापर्यंत 1,19,743 शेतकऱ्यांच्या खात्यातून या योजनेचा पैसा परत घेतला आहे. 

Image result for प्रधानमंत्री सन्मान निधी योजना

शेतकऱ्यांमध्ये चिंता

शेतकऱ्यांच्या खात्यातून अशाप्रकारे पैसे परत घेतले जात असल्याने लाभार्थी नसलेल्या शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रक्रिया कडक

या योजनेतून दिला जाणारा निधी योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी कृषी मंत्रालयालकडून याची प्रक्रिया कडक करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त पात्रच शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे.

Image result for Farmers

सरसकट निधीचे वाटप

ज्यावेळी या योजनेची घोषणा झाली होती. तेव्हा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला होता. यामध्ये पात्र नसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातही निधी जमा करण्यात आला होता. 

पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरु

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी चुकून गेला आहे. त्यांच्या खात्यातून हा निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये 86,314 शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात आले.

Image result for Farmers

सर्वांत जास्त अपात्र शेतकरी उत्तर प्रदेशात

सर्वात जास्त अपात्र असलेले शेतकऱ्यांची संख्या 1,92,39,499 आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये 346, उत्तराखंड 78, हरियाणा 55, जम्मू-काश्मीर 29, झारखंड 22 आणि आसामच्या 2 शेतकऱ्यांच्या खात्यातून हा पैसा परत घेतला गेला.  

आधारकार्ड ठरले फायदेशीर

आधारकार्डचा वापर केल्याने याची पडताळणी करणे सोपे झाले. यातूनच खरी माहिती समोर आली आहे. तसेच जर याबाबतची खोटी माहिती दिली तर मिळालेले संपूर्ण पैसे परत घेतले जाऊ शकतात. 

Image result for cash

पात्र शेतकऱ्यांना निधी मिळावा यासाठी प्रयत्न

आता याची पडताळणी सुरु झाली आहे. त्यामुळे अपात्र शेकऱ्यांकडून हे पैसे परत घेतले जात आहेत आणि आता पात्र शेतकऱयांना हा निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kisan samman yojana Modi Government take money back from farmers who are fake