ज्योतिरादित्य शिंदे आणि परिवार...

टीम ई-सकाळ
Thursday, 12 March 2020

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचा परिवार

दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा 'हात' सोडल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिंदे घराण्यातील आणखी एका राजकारण्याचा समावेश झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्योतिरादित्य शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिरादित्य माधवराव शिंदे आहे. त्यांचा जन्म 1 जानेवारी, 1971 ला मुंबई येथे झाला. ते राज घराण्याशी निगडीत आहेत.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार (यूपीए) सत्तेवर असताना ज्योतिरादित्य यांनी मंत्रिपद सांभाळले होते. 2007, 2009 आणि 2012 मध्ये ते या पदावर होते. यूपीएच्या कार्यकाळात 2007 मध्ये त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर 2009 मध्ये त्यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. काही कालावधीसाठी त्यांनी ऊर्जामंत्रिपदाचाही पदभार स्वीकारला होता. 

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचा परिवार

राजमाता विजयाराजे शिंदे : राजमाता विजयाराजे शिंदे यांनी 1957 मध्ये काँग्रेसमधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी ग्वाल्हेरवर राज्य केले होते. काँग्रेसमधून राजकारणात सुरुवात केल्यानंतर गुना लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. मात्र, फक्त दहा वर्षांतच त्यांनी काँग्रेसला रामराम करत 1967 मध्ये जनसंघात प्रवेश केला.

Patrika.com राजमाता विजयाराजे शिंदे

माधवराव शिंदे : ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील म्हणजे माधवराव शिंदे. माधवराव शिंदे यांना चार बहिणी होत्या. त्यांनी राजकारणात योगदान दिले. अवघ्या 26 व्या वर्षी ते खासदार झाले. 1980 मध्ये माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते विजयी झाले होते. त्यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. 

माधवराव शिंदे

वसुंधराराजे शिंदे : विजयाराजे शिंदे यांच्या मुली वसुंधराराजे शिंदे आणि यशोधराराजे शिंदे यांनीही राजकारणात प्रवेश केला. 1984 मध्ये वसुंधराराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी अनेकवेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. 

वसुंधराराजे शिंदे

यशोधरा राजे शिंदे : यशोधरा राजे शिंदे या वसुंधराराजे शिंदे यांची बहिण आहे. त्या 1977 मध्ये अमेरिकेत गेल्या. शिंदे घराण्यातील इतर व्यक्तींप्रमाणे कोणीही राजकारणात रस दाखवला नाही. पण भारतात परतल्यानंतर 1994 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पाचवेळा आमदारही झाल्या.  

यशोधरा राजे शिंदे

दुष्यंत सिंह : दुष्यंत सिंह हे वसुंधराराजे शिंदे यांचे पुत्र आहेत. तेदेखील सध्या भाजपमध्येच आहेत. सध्या ते राजस्थानच्या झालवाड मतदारसंघातील खासदार आहेत.

 दुष्यंत सिंह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about jyotiraditya scindia family