अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आहेत तरी कोण?

कृपादान आवळे
Sunday, 8 December 2019

स्तंभलेखक म्हणून जबाबदारी

- दोन एनजीओंचे ट्रस्टी

- एमपॉवरचे संचालक

- राजकीय प्रवास 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला तासाभरातच शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी नेमक्या आहेत तरी कोण?

प्रियंका चतुर्वेदी यांचा जन्म 19 नोव्हेंबर, 1979 झाला. त्या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील आहे. त्या विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. सध्या त्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या सदस्या आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळली.

स्तंभलेखक म्हणून जबाबदारी

प्रियंका चतुर्वेदी यांना लेखनाची मोठी आवड आहे. तेहेल्का मासिक, डीएनए वृत्तपत्र आणि फर्स्टस्पॉटमध्ये त्यांनी स्तंभलेखक म्हणून अनेक लेखांचे लेखन केले.  

दोन एनजीओंचे ट्रस्टी

दोन एनजीओंचे ट्रस्टी म्हणूनही प्रियंका चतुर्वेदी यांनी काम पाहिले. त्यांनी बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्याच्या प्रयत्न केले. त्यांनी सेंट जोसेफ माध्यमिक शाळेतून शिक्षण पूर्ण केले. 

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं तासाभरात चोख प्रत्युत्तर

एमपॉवरचे संचालक

प्रियंका चतुर्वेदी यांनी संचालक म्हणून एमपॉवर कन्सल्टन्ट मीडिया, पीआर आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम केले. तसेच त्या प्रयास चॅरिटेबल ट्रस्टसह दोन शाळांचे ट्रस्टीही आहेत. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; शिवसेना कमिशन खोर

राजकीय प्रवास 

- प्रियंका चतुर्वेदी यांनी 2010 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश.

- 2012 मध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या वायव्य मुंबईतील सरचिटणीस.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यावर वारंवार टीका.

- 19 एप्रिल, 2019 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

- शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about Shivsena Leader Priyanka Chaturvedi