KerlaFloods: 15 दिवसानंतर कोची विमानतळावरून उडणार विमान

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

केरळमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, ते आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. येथील परिस्थितीमुळे कोची विमानतळावरून विमानससेवा बंद करण्यात आली होती. 14 ऑगस्टपासून कोची विमानतळावरून कुठल्याही प्रकारच्या विमानाने उड्डाण केले नव्हते. आज (ता.29) दुपारी दोन वाजता तब्बल 15 दिवसानंतर ही बंद झालेली विमानसेवा चालू होणार आहे.

कोची- केरळमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, ते आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. येथील परिस्थितीमुळे कोची विमानतळावरून विमानससेवा बंद करण्यात आली होती. 14 ऑगस्टपासून कोची विमानतळावरून कुठल्याही प्रकारच्या विमानाने उड्डाण केले नव्हते. आज (ता.29) दुपारी दोन वाजता तब्बल 15 दिवसानंतर ही बंद झालेली विमानसेवा चालू होणार आहे.

केरळमध्ये आलेल्या या पुरामुळे कोची विमानतळाचे जवळपास 220 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. याआधी विमानतळ पावसामुळे 9 ऑगस्ट रोजी काही वेळेसाठी बंद करण्यात आले होते. परंतु त्यानंतर 14 ऑगस्टपासून ते बंदच ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पावसाचे संकट कमी झाल्यावर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी विमानसेवा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, ते आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर देशभरातून 'मदतीचा हात' मिळत आहे.

Web Title: Kochi Airport To Reopen Today After 15 Day Shutdown