त्रस्त नागरिकांसाठी चर्चने खुली केली दानपेटी

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कोची (केरळ) : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहत येथील काही चर्चने आपली दानपेटी सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोची (केरळ) : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहत येथील काही चर्चने आपली दानपेटी सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोचीमधील एका चर्चमधील दानपेटीत सुटे पैसे उपलब्ध असल्याने गरजवंतांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून दानपेटी खुली केल्याचे जाहीर केले आहे. "आमच्या दानपेटीत सुटे पैसे आहेत. ज्यांना गरज आहे त्यांनी हे पैसे घेऊन जावे आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी परत द्यावे', अशी माहिती चर्चप्रमुख जिम्मी पुचाकट्ट यांनी दिली. याशिवाय काक्कनड येथील अन्य एका चर्चनेही दोन दानपेट्या सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे. रोख रक्कम जवळ नसल्याने ज्या लोकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांची गरज आहे अशांसाठी ही दानपेटी खुली केल्याचे चर्चने कळविले आहे.

दरम्यान पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय होऊन आठ दिवस झाल्यानंतरही बॅंकांमध्ये गर्दी झाल्याचे दिसत आहे. तेच तेच लोक पुन्हा पुन्हा पैसे बदलून घेण्यासाठी येत असल्याने बॅंकांतील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या बोटांवर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

Web Title: Kochi Church opens up offering box for needy