ते खरे पुरुषच नाहीत

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

ट्विटरवरून 94 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत विराटने आपली मते व्यक्त केली असून, या व्हिडिओत त्याने तुमच्या घरातल्या एखाद्या मुलीवर असा प्रसंग आला तरी तुम्ही बघ्याचीच भूमिका घ्याल का, असा प्रश्‍नही केला आहे.

नवी दिल्ली - नववर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळूरमध्ये झालेली छेडछाडीची घटना अत्यंत निंदनीय असल्याचे मत आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. त्या वेळी शांतपणे हा तमाशा पाहणाऱ्या लोकांना स्वत:ला पुरुष म्हणण्याचा हक्कच नसून, अशा समाजाचा भाग असल्याची मला लाज वाटते, असेही विराटने म्हटले आहे.

ट्विटरवरून 94 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत विराटने आपली मते व्यक्त केली असून, या व्हिडिओत त्याने तुमच्या घरातल्या एखाद्या मुलीवर असा प्रसंग आला तरी तुम्ही बघ्याचीच भूमिका घ्याल का, असा प्रश्‍नही केला आहे. केवळ तिने तोकडे कपडे घातले म्हणून ती पुरुषांसाठी संधी ठरत नाही आणि याचे सत्तेतील लोकांनी समर्थन करणे फारच भयावह असल्याचेही तो म्हणाला. आपण आपली मानसिकता बदलण्याची गरज असून, महिला आणि पुरुषांना समान वागणूक देण्याची तसेच मानसन्मान देण्याचीही गरज आहे, कारण उद्या आपल्या कुटुंबातील एखाद्या मुलीवरही असा प्रसंग ओढवू शकतो, असेही तो म्हणाला.

Web Title: Kohli slams Bangalore molesters