धर्मराज चडचन याचा एन्काऊंटर; इन्स्पेक्टरवर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

धर्मराज याच्या टोळीने पोलिसांच्यावर गोळीबार केला.

विजापूर : जिल्ह्यातील चडचन गावामध्ये पोलिस निरीक्षक श्रीशेल यांच्यावर गोळीबार झाला आहे, तर गुंड धर्मराज चडचन याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. गुंड धर्मराज यांच्याकडे अवैध पिस्तुल असल्याने पोलीस निरीक्षक श्रीशेल हे छापा टाकण्यासाठी गेले होते, या घटनेने चडचनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, 

महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वर चडचन येथे गुंड धर्मराज चडचन यांच्याकडे अवैध पिस्तुल असल्याचे कळले, यावेळी पोलीस निरीक्षक श्रीशेल यांनी छापा टाकला असता,  यावेळी धर्मराज याच्या टोळीने पोलिसांच्यावर गोळीबार केला. यास प्रतिउत्तर म्हणून पोलीस निरीक्षक यांनी ही गोळी बार केल्यावर गुंड धर्मराज याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर पोलीस निरीक्षक हे जखमी झाले आहेत, पोलीस निरीक्षक याच्यावर कर्नाटक येथील विजापूर च्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

Web Title: kolhapur news criminal chadchan encountered