बंगळूर पोलिस कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह गोवा राज्यातही तपास सुरू केला आहे. तपासाच्या अनुषंगाने बंगळूर येथील पोलिस कोल्हापुरात दाखल झाले आहेत. स्थानिक पोलिसांकडून हे पथक ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतची माहिती घेत असल्याचे सूत्रांकडून समजते.

बंगळूर येथे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या झाली. पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कोल्हापुरात गोविंद पानसरे, तर कर्नाटकातील डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. या तिन्ही हत्येत मारेकऱ्यांनी वापरलेल्या शस्त्रांमध्ये साम्य असल्याचा अंदाज तपास यंत्रणेकडून वर्तवला गेला होता. त्यानुसार तिन्ही हत्यांच्या तपासात साधर्म्य असून, त्याचा एकत्रित तपास व्हावा, अशी मागणीही विविध संघटनांनी उचलून धरली होती. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली, या हत्येचा डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हत्येशी काही संबंध आहे का? हे तपासण्याचे काम कर्नाटक पोलिसांकडून सुरू आहे. या अनुषंगाने बंगळूरमधील पोलिसांचे पथक कोल्हापुरात दखल झाले. या पथकाने कोल्हापूर पोलिसांकडून पानसरे यांच्या हत्येबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: kolhapur news gouri lankesh investigation