Mamata Banerjee : पक्षासाठी अमित शहांना फोन केला हे सिद्ध झालं तर मी...; ममता बॅनर्जीआक्रमक

Amit Shah, Mamata Banerjee
Amit Shah, Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा दावा फेटाळून लावला आहे. बुधवारी सीएम ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन.

Amit Shah, Mamata Banerjee
Weather Updates: नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा! तापमानात होणार मोठी घट - IMD

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. 18 एप्रिल रोजी, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे एका रॅलीला संबोधित करताना, टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता, असा दावा केला होता.

आयोगाचा निर्णय रद्द करण्याची विनंती बॅनर्जी यांनी शाह यांना केली होती, असा दावा अधिकारींनी केला होता. सुवेंदू अधिकारी यांच्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारण तापले आहे. त्याच वेळी, यावर तीव्र प्रतिक्रिया देत, टीएमसीने सर्व दावे फेटाळले आहेत.

Amit Shah, Mamata Banerjee
Aaditya Thackeray : शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोटाळे सुरू ; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप!

शुभेंदू अधिकारी म्हणाले होते, 'ममता बॅनर्जींनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली हे आम्ही कालच पाहिले. परंतु, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर, त्यांनी शहांना वारंवार फोन करून निर्णय रद्द करण्याची विनंती केली. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

ममता बॅनर्जी यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि म्हणाल्या, 'मी अमित शहा यांना टीएमसीच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी फोन केला हे सिद्ध झाले तर राजीनामा देईन.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com