कोलकता-ढाका मालगाडीला प्रायोगिक तत्त्वावर सुरवात

पीटीआय
बुधवार, 4 एप्रिल 2018

बांगलादेशची राजधानी ढाका येथील मजेरहाट स्थानकातून कोलकता-ढाका मालगाडीला प्रायोगिक तत्त्वावर सुरवात करण्यात आली. लवकरच ही रेल्वे मालगाडी नियमित करण्यात येणार असल्याचे पूर्व रेल्वे विभागाचे व्यवस्थापक हरींद्र राव यांनी सांगितले.

कोलकता : बांगलादेशची राजधानी ढाका येथील मजेरहाट स्थानकातून कोलकता-ढाका मालगाडीला प्रायोगिक तत्त्वावर सुरवात करण्यात आली. लवकरच ही रेल्वे मालगाडी नियमित करण्यात येणार असल्याचे पूर्व रेल्वे विभागाचे व्यवस्थापक हरींद्र राव यांनी सांगितले. वेगवान व सुरक्षित प्रवासाच्या मागणीचा विचार करून ही मालगाडी सुरू केली असल्याची माहिती राव यांनी दिली. 

दोन्ही देशांमधील काही औपचारिकता पूर्ण करून लवकरच ही रेल्वे नियमित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले, बांगलादेशातून अन्नधान्य, पोलाद व सिमेंटची वाढती मागणी होती. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी व मालवाहतुकीसाठी ही नवीन व्यवस्था केली असल्याचे भारतीय मालगाडी संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक कल्याण रामा यांनी सांगितले. ही मालगाडी 301 किलोमीटरचे अंतर पार करणार असून, भारतातील मजेरहाट-नैहाती-राणाघाट-गेडे ही स्थानके, तर बांगलादेशातील दर्सना-इसुर्डी-बंगबंधू आदी स्थानकांवर ही मालगाडी प्रवास करेल, अशी माहिती पूर्व रेल्वेच्या सूत्रांनी दिली. 

Web Title: Kolkata Dhaka Transport Station Temporary Sceme Start