Kolkata Crime News: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एक संदिग्ध बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांच्या मंचाच्या जवळच ही बॅग आढळून आली. .बेवारस बॅगची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाला पाचारण करण्यात आलं. दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत बॉम्ब स्क्वॉड पथक घटनास्थळी दाखल झालेलं नव्हतं. या बॅगमुळे आंदोलकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत..एका प्रशिक्षणार्थी डॉक्टवर बलात्कार करुन तिचा खून केल्यानंतर देशभर संतापाची लाट आहे. कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने वारंवार कामावर जाण्याच्या सूचना करुनही अद्यापही आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही..दुसरीकडे आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात ईडीची टीम आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करत आहे. यापूर्वी सीबीआयच्या टीमने घोष यांची चौकशी केलेली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या आणखी चार ठिकाणांवर छापेमारी केली आहे..छापेमारीमध्ये आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे फॉरेन्सिक मेडिसिन तथा टॉक्सिकोलॉजीचे डेमोस्ट्रेटर डॉ. देबाशीष सोम यांच्याही घराचा समावेश होता. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.